ग्रामपंचायत तणाशी

तणाशी हे एक लहान पण निसर्गरम्य गाव आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात एकूण २५५ घरे असून एकूण लोकसंख्या १,०५३ आहे. यामध्ये ५२२ पुरुष आणि ५३१ महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालसंख्या १०५ असून त्यात ५७ मुलगे आणि ४८ मुली आहेत. अनुसूचित जातीची लोकसंख्या नाही, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३६९ असून त्यात १८४ पुरुष आणि १८५ महिला आहेत.या गावात मुख्यतः आदिवासी समाज व काही प्रमाणात इतर समाजाचे लोक राहतात. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व शेतमजुरी आहे. काही कुटुंबे वीटभट्टी, बांधकाम आणि इतर मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच कुक्कुटपालन (कोंबड्या पालन), बकरीपालन यासारखे पूरक व्यवसायही केले जातात.पावसाळ्याच्या दिवसांत, विशेषतः श्रावण महिन्यात, अनाशी गावाच्या परिसरात अळंबी (वनभाजी) मोठ्या प्रमाणात उगवते. ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक मानली जाते. अळंबी उगवल्यानंतर ती लगेचच तोडावी लागते, कारण ती लवकर फुलून खाण्यास अयोग्य होते. गावातील आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून जंगलात जाऊन अळंबी गोळा करतात व ती बाजारात विकून पावसाळ्यात अल्पकालीन रोजगार मिळवतात.अशा प्रकारे अनाशी गावात पारंपरिक जीवनशैली, शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आणि निसर्गाशी घट्ट नाते असलेले साधे, शांत जीवन पाहायला मिळते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
१०५३ 
पुरुष लोकसंख्या
५२२ 
महिला लोकसंख्या
५३१ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
१०५ 
अनुसूचित जाती (SC %)
अनुसूचित जमाती (ST %)
३६९

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) नाही     होय 
उपकेंद्र (Sub Center)  नाही  होय  
अंगणवाडी आहे   ३  होय  
प्राथमिक शाळा  आहे  २   होय  
माध्यमिक शाळा  आहे  १  होय  
उच्च माध्यमिक शाळा  नाही     
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र  नाही     
समुदाय भवन (Community Hall) नाही      
१० स्वस्त दर दुकान (PDS)  होय   २  होय  
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी होय   ४  होय  
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर होय    १  होय  
१३ सीएससी केंद्र (CSC Center)  होय  १   होय  

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  GRAMPANCHYAT TANASHI VADHAN JITENDRA GANPAT (SARPANCH) PATIL YOGITA

बँकेचे नाव :  THE THANE DISTRICT CENTRAL CO. OP. BANK LTD.

शाखेचे नाव:  CHINCHANI (चिंचणी)

अकाउंट नंबर : 002000300000341

आई एफ एस सी कोड : TDCB0000020

पत्ता : ग्रामपंचायत तणाशी
 AT PO TANASHI, TAL DAHANU, DIST PALGHAR (401503)